1)प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना पुरस्कार.
2)प्रधानमंत्री सुरक्षा योजना
3)अटल पेंशन योजना
4)सुकन्या समृध्दी योजना
5)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
6) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
7)इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना
8)राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत. सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.
✓ घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे. घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचे स्वरूप:–
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.
✓ लाभार्थी पात्रता:–
1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :- अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख
✓ घराची किंमत मर्यादा:–
घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
✓ आवश्यक कागदपत्रे:–
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र 4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
9. ग्रामसभेचा ठराव
3)नैतिक मूल्य
1)रोजगार मेळावे
2)आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे
3)रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना
4)ग्रंथालयसदृश अभ्यासिका सुरु करणे
1)केंद्रीय अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजना
2)खावटी कर्ज योजना
3) ठक्कर बाप्पा आदिवासी बस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम
4) नवसंजीवनी योजना
1)एकात्मिक बाल विकास सेवा योजना
2) मनोधैर्य योजना.
3) राजीव गांधी सबला योजना
4) बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना
5)माझी कन्या भाग्यश्री योजना
6) बाल संगोपन योजना
7) बाल सल्ला केंद्र
8) निराश्रित महिलांसाठी आधार गृहे
9)अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्री बाई फुले बहुउदशिय महिला केंद्र
10) महिला समपदेश केंद्र शुभमंगल
11)शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
12)अनाथालय महिला स्वीकृती केंद्रे आणि
संरक्षित गृहे यामधील .
13) निराधार आणि परित्यक्त्या
विधवांच्यामुलींच्या विवाहाकरीता अनुदान
ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करणेचे दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीद्वारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात रहाण्या-या व अंग मेहनतीची अकुशल कामे करण्या-या, मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारीत केला असुन सदर कायदयान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना,व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणलेली आहे.जिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.
✓ योजनेची वैशिष्ठे –
● ग्रामपंचायत स्तरावर कामाची निवड ग्राम सभा करणार
● तालुका पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी पंचायत समिती देणार
● जिल्हा पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी जिल्हा परिषद देणार
● मंजुर कामांच्या ७५ टक्के खर्चाची कामे ग्राम पंचायत मार्फत राबविणार
● १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजगार देण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहिल.
● शासन निकषा प्रमाणे किमान मजुरीची हमी.
● अर्ज केल्यापासुन १५ दिवसांत रोजगार पुरविणार.
● कुटुंबातील प्रौढ व्यक्ती अर्जाद्वारे त्याचे सर्व कुटबातील व्यक्तींची नावे नोंदणी करु शकतील
● एकदा केलेली नोंदणी ५ वर्षे कालावधीकरीता राहिल.
● रोहयो कायदया अंतर्गत मजुरांना मिळणा-या सर्व सोई सुविधा मिळतील.
● विविध स्तरावरील कर्तव्य्
✓ १.ग्रामपंचायत स्तरः- –
● कुटुंबांची /मजुरांची नोंदणी करणे/जॉबकार्डवरील नोंदी करणे
● मजुरांची कामाची मागणी घेणे/कामे पुरविणे
● कामाचे सर्वेक्षण करणे/अंदाजपत्रक करणे
● कामाचे नियोजन करणे
● मजुरांना मजुरी व कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे
● वेळेवर मजुरी वाटप करणे
● सामाजिक अंकेशन
✓ २.तालुका स्तर –
● ग्रामपंचायतींना कामाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करणे
● कामाचे नियोजन करुन घेणे
● हजेरीपट व निधीचा हिशोब ठेवणे
● तालुक्याची माहिती संगणक प्रणालीचा वापर करुन संकलित करुन जिल्हा स्तरावर पाठविणे
● संगणक प्रणालीद्वारे झालेल्या कामांचे हजेरीपट ऑनलाईन करणे
✓ ३.उपविभाग स्तर–
●महसुल विभाग
✓ ४.जिल्हास्तर–
● जिल्हयातील सर्व कामांचे नियोजन करुन घेणे
● निधींचा हिशोब ठेवणे
● केंद्र राज्य शासनाकडे आवश्यक ती माहिती पाठविणे
● कामाचे सनियंत्रण करणे.
● ग्रामसेवक/ग्रामरोजगार सेवक यांची कर्तव्ये
● कुटब नोंदणी रोजगार पत्रक वाटप/कामांचे वाटप
● नियोजन आराखडा-कामांचा समावेश/प्राधान्यक्रम/सेल्फ तयार करणे.
● ७५ टक्के कामाचे कार्यान्वयन
● मजुरी वाटप
● बेरोजगार भत्ता वाटप(पहिले-३०दिवसांसाठी.२५टक्के पुढील १०० दिवसापर्यंत किमान वेतनाच्या ५० टक्के)
● रोजगार हमी दिन आयोजन
● सामाजिक लेखा परिक्षणास मदत.
✓ सरपंचांची भुमिकाः-–
● ग्रामपंचायत क्षेत्रात घ्यावयाची कामे ग्रामसभेमध्ये निश्चित करणे.
● गट कार्यक्रम अधिकारी यांच्या मंजुरीने कार्यक्षेत्रातील कामे हाती घेणेकामी विविध यंत्रणांना मदत करणे.
● ग्राम सभेच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेकामी मदत.
● पुढील वर्षी घ्यावयाच्या कामांचा विकास आराखडा गट कार्यक्रम अधिकारी यांचेकडे पाठविणे कामी मदत.
● मजुरांची मागणी केलेनंतर कामे तात्काळ सुरु करणेचे दृष्टीने पाठपुरावा करणे
● सामाजिक अंकेशन कामी मदत.
● वार्षिक नियोजन व लेबर बजेट